नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपविरोधात केलेल्या एकदिवसीय उपोषणानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह हे काँग्रेसविरोधात एक दिवसीय उपोषण करणार आहेत. गुरुवारी 12 एप्रिल रोजी हे उपोषण करण्यात येणार असून संसदेतील बजेट सत्रात विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे हे बजेट सत्र वाया घालवलं असल्यामुळे याचा निषेध नोंदवण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भाजपाला 21 राज्यात सरकारनं सत्ता दिली असल्यामुळे काँग्रेस भाजपाशी शत्रुत्वानं वागत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी केला होता.
दरम्यान दलितांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय उपोषण केलं होतं. त्यानंतर आता अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसविरोधात उपोषण कऱण्याचं ठरवलं आहे. 12 एप्रिलरोजी ते दिल्लीत उपोषण करणार आहेत. त्यामुळे या उपोषणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS