नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एका महिलेच्या पायात चप्पल घातली असल्याचं समोर आलं आहे. एका कार्यक्रमात मोदींना या वृद्ध महिलेला चप्पल भेट देत तिच्या पायात चप्पल घातल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्तीसगडच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी महिलेच्या पायात आपल्या हाताने चप्पल घातली आहे. बीजापूरमध्ये मंचावर आलेल्या एका आदिवासी महिलेला चप्पल भेट देण्यात आली आहे. पीएम नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे या योजनेद्वारे तेंदू पत्ता जमा करणाऱ्या महिलांना चप्पल देण्यात आल्या आहेत.
#WATCH PM Modi presented a pair of slippers to a tribal woman under the Charan-Paduka (footwear) Scheme. The scheme aims to provide footwear to Tendu leaves (tendupatta) collectors to facilitate smooth movement in the forest area pic.twitter.com/foExDYehoH
— ANI (@ANI) April 14, 2018
दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयुष्यमान भारत योजनेनुसार पहिल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी नक्षल प्रभावित जिल्ह्यातील स्थानिक चॅम्पियन्स ऑफ चेन्ज यांच्याशीही चर्चा केली असल्याची माहिती आहे. परंतु मोदींनी आपला साधेपणा दाखवत स्वतः या महिलेला चप्पल घातल्यामुळे सर्वत्र मोदींचीच चर्चा रंगली आहे.
COMMENTS