मुंबई – केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला असून राज्यात क्यार वादळामुळे अवकाळी पाऊस पडून शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यीय केंद्रीय पथक उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात येणार आहे.औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये हे पथक भेट देणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. त्यामुळे केंद्राकडून शेतकय्रांना दिलासा मिळणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान केंद्राकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी हेक्टरी 6800 रूपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 13500, फळबागांसाठी प्रति हेक्टर 18000 रुपये अशी मदत देण्यात येणार असल्याची माहिती आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील 34 जिल्हे आणि 352 तालुक्यांना बसलेला असून 94 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे.
COMMENTS