मोदींचा भ्रष्ट चेहरा समोर, तात्काळ राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

मोदींचा भ्रष्ट चेहरा समोर, तात्काळ राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भ्रष्ट चेहरा समोर आला असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान खरेदी सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेची आणि देशातल्या 130 कोटी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान “चौकीदार ही भागीदार है।” हे ही सिध्द झाले असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत व संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान मोदींना देशहितापेक्षा त्यांच्या उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत, हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिध्द झाले आहे. देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीची राफेल डील बदलली असल्याचा आरोपही यावेळी चव्हाणांनी केला आहे.

COMMENTS