मुंबई – माथाडी कामगारांचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. त्यानंतर लगेच पाटील यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची दिली माहिती त्यांनी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती करून मराठा समाजाच्या हितासाठी काम करण्याची मुख्यमंत्र्यांनी संधी दिली असल्याचंही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा निवडणूक भाजपकडून लढण्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी मान्य केलं आहे.
COMMENTS