मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या जागेसाठी आज मतदान सुरु आहे. परंतु या मतदानादरम्यान क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून शिवसेनेनं सावधानतेचा पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत पोलिंग एजंट म्हणून मिलिंद नार्वेकर हे जातीनं लक्ष देत आहेत.याचाच फायदा घेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेना आमदारांवर उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाही, त्यामुळेच प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून मिलिंद नार्वेकरांना विधानभवनात बसवलं असल्याचा तिरकस टोला राष्ट्रवादीनं लगावला आहे.
या निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपच्या 102, शिवसेनेच्या 51, राष्ट्रवादीच्या 36 आणि काँग्रेसच्या 32 आमदारांनी मतदान केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला असून पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पहिलं मतदान केलं आहे.
विधानरिषदेत शिवसेना-भाजपकडे 191 तर राष्ट्रवादी-काँग्रेसकडे 81 आमदार आहेत. यावरुन भाजपच्याच उमेदवाराचा विजय होणार असला तरी देखील मतं फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून खास पवित्रा घेण्यात आला आहे.
COMMENTS