मुंबई – माहुल प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडणार, नसीम खान यांचं आश्वासन

मुंबई – माहुल प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडणार, नसीम खान यांचं आश्वासन

संजय पाटील

मुंबई – माहुलमधील प्रकल्पग्रस्तांच कुर्ल्यातील एचडीआयएल येथे पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन राज्य सरकारने गेल्या सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल होतं. या निर्णयाची  लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार नसीम खान यांनी सांगितलं. काल रविवारी नसीम खान यांनी माहुल प्रकल्पग्रस्तांना माहुले येथे भेट दिली, तेव्हा ते बोलत होते.

यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील येणार होते. पण हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला असलेल्या महत्तवाच्या कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी नसीम खान म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन करताना सुरक्षित आणि सर्व सोयींयुक्त ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. पण माहुलप्रकस्पग्रस्तांना असं काहीच मिळालं नाही. कुर्ल्यातील एचडीआयएल येथे १७,००० घर रिकामी आहेत. त्यापैकी ५,५०० घरं ही माहुलप्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवावीत अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.

COMMENTS