नाशिक : नाशिकमध्ये माजी आमदार बाळासाहेब सापन यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना धक्का दिला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये जाऊन भाजपला खिंडार पडण्याचे नियोजन केले. त्यानुसार आज माजी आमदार वसंत गिते आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. हे दोघेही आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
वसंत गिते आणि सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपमध्ये होते. गिते पहिल्यांदा नाशिकचे महापौर होते. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. दरम्यान, त्यांनी मनसेतून विधानसभेचे आमदारर झाले. तर सुनील बागूल हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना त्यांनी श्रमिक सेनेची स्थापना केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेथे न रमल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्येही त्यांची घुसमट होऊन लागल्याने दोघांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची तयार केली होती. काही दिवसांपूर्वी गिते यांनी मिसळपार्टीचे आयोजने करून शक्ती प्रदर्शन केले होते.आज शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
COMMENTS