नाशिक – मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर शहरवासियांना विकासकामांबाबत नवनवीन काय संकल्पना येतात तसेच सरकारकडून विकासासाठी काय पाऊले उचलली जातात याकडे लक्ष लागलं आहे. शहरात अस्तीत्वात असलेल्या दादासाहेब फाळके स्मारक, यशवंत मंडईचा वनवास, पेलिकन पार्क यासारख्या वास्तुंचा कधी विकास होणार याची आस नाशिककरांना लागली आहे.
पालिकेचा आराखडा
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या शहराच्या मध्यवर्ती रविवार कारंजावरील यशवंत मंडळीच्या जागेवर पार्किंगसाठीची अत्याधुनिक अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणांचा पुनर्विकास केला जाणार असून फाळके स्मारक हे प्रायव्हेट तत्वावर देण्याचा विचार असल्याचं बोललं जात आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न त्यातील काही हिस्सा महापालिकेला महसूल स्वरुपात देण्यात येणार आहे. सिडकोतील पेलिकन पार्क हा मोठा भूखंड येथे प्रस्तावीत योजनेतून प्रवेश फी ही ठेकेदार विशीष्ठ प्रमाणात वाटून घेणार आहे. तसेच द्वारका सर्कलवरील जागेवर सध्याच्या दुकानधारकांना भाडे आकारून जागा दिली जाणार असल्याचे समजते.
पालिकेकडून जरी या कामांना आराखडा तयार होऊन तो मांडण्यात आला असला तरी प्रत्यक्षात ही कामे कधी सुरू होणार आणि त्याहीपेक्षा जास्त ती कधी प्रत्यक्षात येणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. वास्तविक पाहता फाळके स्मारकासारखी भव्य वास्तु आज ओस पडली आहे. तेथील साहित्याची हेळसांड हा तर तेथे येणार प्रेक्षक ‘या विषयावर न बोलेले बरं’ असंच म्हणत असतील. त्या वास्तु आहेत त्याच्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष व एलईडी, डस्टबीन यासारखे आर्थिक हितसंबंधात मंजूर होणारे विषय हाही शहरासाठी चर्चेचा विषय म्हणावा लागेल.यावरुन नाशिककरांना फक्त विकासाची स्वप्नच पडत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS