नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी भाजपचे केदा आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यादरम्यान भाजपचे केदा आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही बॅंक गेली वर्षभरापासून आर्थिक अडचणीत होती. बॅंकेतील ठेवी तसेच वेतन देण्यासाठीही बँकेकडे पैसे नव्हते. याबाबत राज्य सरकारकडून सहकार्य मिळवण्यासाठी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते नरेंद्र दराडे यांनी प्रयत्न केले होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कोकाटे व दोन संचालकांकडे राजीनामा दिला होता.
या बँकेच्या अध्यक्षपदासाठी संचालक परवेझ कोकणी देखील इच्छुक होते. त्याचबरोबर खासदार चव्हाण व आमदार हिरे बॅंकेची स्थिती बघता स्पर्धेतुन बाहेर पडले. त्यानंतर विरोधी गटानेही कोकाटे यांच्याऐवजी केदा आहेर यांना पसंती दिली. त्यानंतर मावळते अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्याकडून केदा आहेर यांनी पदभार स्विकारला.
COMMENTS