मला फक्त एकच पेय आवडते, नाशिकला आल्यावर मला ते देत जा –गिरीष महाजन

मला फक्त एकच पेय आवडते, नाशिकला आल्यावर मला ते देत जा –गिरीष महाजन

नाशिक – मला फक्त एकच पेय लागते ते नाशिकला आल्यावर मला देत जा असं वक्तव्य गिरीष महाजन यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात केलं आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या दूधाच्या “एटीएम’ वितरण केंद्राचे उद्‌घाटन महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मला फक्त एकच पेय आवडते ते म्हणजे दूध. मी नाशिकला आलो की मला सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा लिटर देत जा, मी त्यामध्ये आनंदी राहिन असं महाजन म्हणाले आहेत. महाजनांच्या वक्तव्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला होता.

मी अन्य कोणतेही पेय घेत नाही. मला केवळ एकच पेय आवडते. आमदार कोकाटेंसह बहुतांश आमदारांना हे माहिती आहे. त्यामुळे अन्य पेयाव्यतीरीक्त मला दूध देत जा त्यामध्ये मी खूश राहिन असं महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच मी महत्त्वाची कामं सोडून या उद्घाटनाला उपस्थिती लावली असल्याचंही महाजन यांनी म्हटलं आहे. त्यावेळी महाजन यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

COMMENTS