नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का, कार्यकर्त्यांमध्ये फूट ?

नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का, कार्यकर्त्यांमध्ये फूट ?

नाशिक – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु छगन भुजबळ यांनीची लोकसभेची निवडणूक लढवावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.  यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून याठिकाणी राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून छगन भुजबळांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. परंतु समीर भुजबळ हे नाशिकमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची उमदेवारी निश्चित झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या प्रचारसभांना सातत्याने हजेरी लावत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक छगन भुजबळ यांनीची लढवावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे याबाबत आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लगालं आहे.

COMMENTS