नाशिक – प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीचे पडघम !

नाशिक – प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीचे पडघम !

नाशिक – प्रभाग क्र. १३ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाला या संदर्भात अहवाल पाठविला जाणार आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक कधी जाहीर होते याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मनसे या ठिकाणी कोणाला उमेदवारी देणार याबद्दलही उत्सुकता आहे.

          या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार देणार नाही अशी घोषणा आधीच केली आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुरेखा भोसले यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीने जरी उमेदवार देणार नाही अशी घोषणा केली असली तरी त्यांच्या गोटातही या जागेसाठी हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र भाजपने उमेदवार दिल्यास शिवसनाही या जागेवर उमेदवार देईल असे विश्वासनीय सूत्रांकडे समजते. तसंच आघाडीही आपला उमेदवार रिंगणार उतरवेल अशी चिन्हे आहेत.

COMMENTS