नाशिकमधील ‘या’ रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्या थांबवा, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन !

नाशिकमधील ‘या’ रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्या थांबवा, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन !

नाशिक – नांदगावसह,  न्यायडोंगरी, लासलगाव, निफाडध्ये रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवेदन दिलं आहे. लासलगाव येथे  नंदीग्राम, डाऊन रेल्वे  एक्स्प्रेसससाठी, निफाड येथे कामयानी एक्सप्रेस, भुसावळ – पुणे, एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस व नांदगाव  येथे महानगरी, भुसावळ – पुणे तसेच  न्यायडोंगरी येथे भुसावळ – पुणे एक्सप्रेस व सेवाग्राम  एक्सप्रेस  या रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी खासदार श्री हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल  यांना  निवेदन दिलं आहे.

दरम्यान लासलगाव, नांदगाव, निफाड, न्यायडोंगरी येथील  रेल्वे गाड्यांचा थांबा शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, नोकरी, व्यवसायिक, शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी  केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना समजावून सांगितलं आहे. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयेल यांनी योग्य परीक्षण करून नक्कीच थांबा देण्याचे आश्वासन खासदार चव्हाण यांना दिलं आहे.

 

COMMENTS