नाशिक – मुजोर रिक्षाचालकांना राजकीय वरदहस्त !

नाशिक – मुजोर रिक्षाचालकांना राजकीय वरदहस्त !

नाशिक –  नाशिकमधील अनधिकृत रिक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट होत आहे. या लुटीमुळे प्रवाशी त्रस्त झाले असून शहराच्या मध्यवर्ती अशा रविवार कारंजा, शालीमार चौक, या प्रमुख मार्गांवर या महाशयांचा अड्डाच झाला आहे. अधिकृत बस थांब्यांवर सुद्धा हे रिक्षाचालक आपल्या रिक्षा उभ्या करून सरकारी यंत्रणेला आव्हान देताना दिसत आहेत. या मुजोर रिक्षाचालकांकडे शहरातील पोलिसही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

विशेष म्हणजे हे अनधिकृत रिक्षे शहराच्या उच्चभ्रू समजल्या जाणा-या शरणपूर रोड व गंगापूर रोडकडली रिक्षा पोलीस आयुक्त कार्यालय, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या समोरून जातात. तसेच ते प्रवाशांची अनधिकृत वाहतूक पोलिसांसमोर करतात. दरम्यान या मुजोर रिक्षाचालक कोणत्याही प्रकारचा अधिकृत बिल्ला अथवा त्यांना ठरवून दिलेला गणवेशही परिधान करत नाहीत. गेल्या वर्षभरात या रिक्षाचालकांनी चक्क वाहतूक पोलिसांवरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही रिक्षाचालकांना राजकीय नेतेही पाठिशी घालत असल्याचा आरोप शहरवासियांकडून केला जात आहे.

COMMENTS