नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी रास्तारोको मात्र संप शांततेत संपन्न !

नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी रास्तारोको मात्र संप शांततेत संपन्न !

नृपाली देशपांडे, नाशिक

नाशिक – भीमा कोरेगाव येथे विजयी शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यास गेलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक  झाल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना वगळता बंद शांततेत पार पडला. नाशिक शहरात काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. मनमाड, मालेगाव, सटाणा, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी आदी ठिकाणीही बंदचा प्रभाव काही प्रमाणात दिसून आला. व्यावसायिकांनी आपली दुकाने व अस्थापने बंद ठेवली होती.

नाशिक शहरातून मोर्चाचेही आयोजन करण्यात आला होतं.  त्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे आणि आंदोलकांनीही शांततेत आंदोलन केल्यामुळे किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला. द्वारका चौकातील रास्ता रोको मुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र थोड्यावेळातच ती पूर्वपदावर आली. शहराच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. काही शाळांनाही सुटी देण्यात आली होती. शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज सुरळीत सुरू होते.

COMMENTS