“स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही !”

“स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही !”

नवी दिल्ली  65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात होणार आहे. परंतु पुरस्कार वितरणावरुन वादाला तोंड फुटणार असल्याचं दिसून येत असून व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे ते अकराच मानकऱ्यांना सन्मानित करणार आहेत. तर काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.

दरम्यान स्मृती इराणींकडून पुरस्कार घेण्यास आमचा विरोध नाही, तर राष्ट्रीय पुरस्कार असून तो राष्ट्रपतींकडून न दिला जाण्याला आमचा विरोध आहे. इतर पुरस्कार सोहळ्यात आम्ही स्मृती इराणींच्या हस्ते सन्मान स्वीकारलाच असता असं पुरस्कार विजेते म्हणत आहेत.

COMMENTS