मुंबई – राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जागा सध्या रिक्त आहे. परिवर्तन यात्रेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदासाठी राष्ट्रवादीतील अनेकांची नावे चर्चेत आहेत. परंतु सध्या कोकणातील अजित यशवंतराव यांचे नाव आघाडीवर आहे. यशवंतराव यांची मागील कामगिरी पाहता त्यांचीच या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.
अजित यशवंतराव यांची पक्षातील कामगिरी
अजित यशवंतराव हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिटणीसपदी कार्यरत आहेत.
युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले
निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले
कोकणातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचे काम केले
2014 साली विधानसभा निवडणुकीत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आवाज उठवला
लोकसभा व विधानसभेच्या 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 2012 पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये कार्यरत
COMMENTS