नवी मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणूकीसाठी आज अर्ज भरण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादीचा महापौर तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून दोन अर्ज भरण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत काँग्रेसमध्ये फुट पडल्याच चित्र आहे.
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती दशरथ भगत यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला असून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नी मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी देखील उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे. नवी मुंबईत काँग्रेसचे दोन गट पडले आहेत.
COMMENTS