22 दिवसानंतर किचनमध्ये, खासदार नवनीत राणांनी बाप्पासाठी बनवले मोदक!

22 दिवसानंतर किचनमध्ये, खासदार नवनीत राणांनी बाप्पासाठी बनवले मोदक!

मुंबई – खासदार नवनीत राणांच्या घरी गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी नवनीत राणा यांच्यासह कुटुंबातील सर्वांनी बाप्पाचे जोरदार स्वागत केले. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांची प्रकृती तर चांगलीच खालावली होती. त्यानंतर त्यांना नागपुरातून मुंबईमध्ये हलवण्यात आलं होतं. 22 दिवसानंतर अखेर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर आज त्यांनी आपल्या घरात गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी आपल्या हातांनी गणरायासाठी मोदक बनवले.

COMMENTS