भाजपची लाट ओसरली, अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक – नवाब मलिक

भाजपची लाट ओसरली, अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक – नवाब मलिक

मुंबई – भाजपचे अनेक नेते शिवसेनेत जाण्यास उत्सुक असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपची लाट ओसरली आहे. अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक असून आठवड्याभरात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा मलिक यांनी केला आहे.

दरम्यान दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचार करत आहेत, पण महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवलेल्या नेत्यांनाही पक्ष बदलायचा आहे. ज्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी आयुष्य खर्ची काढलं, त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यामुळे तेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपचे नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ते उत्सुक आहेत. एका आठवड्यात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा मलिक यांनी केला आहे.

COMMENTS