मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली असून या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही कोणत्या जागा लढणार त्यावर चर्चा झाली. तसेच आम्ही ज्या जागा लढवणार आहोत तिथले उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा झाली आहे. परंतु अजून याबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.तसेच काँग्रेसला आम्ही 50 टक्के जागेचा प्रस्ताव दिला असून कोणत्या जागा लढवायच्या याबाबत काँग्रेससोबत चर्चा करण्यात आली असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व @INCMaharashtra च्या प्रमुख नेत्यांची आज विरोधी पक्षनेते @dhananjay_munde यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी राज्यातील #दुष्काळ व लोडशेडिंगसारख्या इतर समस्यांवरही चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/TQnVj0nJ39
— NCP (@NCPspeaks) October 12, 2018
दरम्यान गेल्यावेळी लढवलेल्या काही जांगामध्ये आदलाबदल होण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा सांगितला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. तर पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बैठक सुरु असून बैठकीकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
COMMENTS