मुंबई – काही दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिनीने शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये शरद पवार यांनी राफेलबाबत पंतप्रधान मोदींची पाठराखण केली असल्याची बातमी दिली होती. परंतु याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. पवार साहेबांनी तसं वक्तव्य केलं नसून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. साहेबांच्या राफेलबाबतच्या विधानाचा विपर्यास करून आणि त्याला चुकीच्या पद्धतीने वापरून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे काम वृत्तवाहिनी करत आहे आणि वेब पोर्टल आणि सोशल मीडियावर चुकीचे वृत्त पसरविले जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
राफेलबाबत सरकारतर्फे कोणताही खुलासा केला जात नाही त्यामुळे राफेलबाबात निर्णय घेणाऱ्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. राफेलबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होतेय असे वक्तव्य @PawarSpeaks साहेबांनी केले होते. मात्र @News18lokmat ने वक्तव्याचा विपर्यास करत चुकीची बातमी प्रसारित केली pic.twitter.com/T3ebZI1TTq
— NCP (@NCPspeaks) September 27, 2018
दरम्यान राफेलबाबत सरकारतर्फे कोणताही खुलासा केला जात नाही त्यामुळे राफेलबाबात निर्णय घेणाऱ्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. राफेलबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होतेय असे वक्तव्य पवार साहेबांनी केले होते. मात्र वृत्तवाहिनीने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत चुकीची बातमी प्रसारित केली असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
या सर्व प्रकरणात सरकारने जॉईंट पार्लमेंट्री कमिटीची स्थापना करावी, विमानांच्या किमती का वाढल्या, एचएएल या कंपनीचे कंत्राट का रद्द केले याचा खुलासा करावा, हीच पक्षाची भूमिका आणि मागणी आहे. – @nawabmalikncp pic.twitter.com/6CpxckCL6w
— NCP (@NCPspeaks) September 27, 2018
तसेच या सर्व प्रकरणात सरकारने जॉईंट पार्लमेंट्री कमिटीची स्थापना करावी, विमानांच्या किंमती का वाढल्या, एचएएल या कंपनीचे कंत्राट का रद्द केले याचा खुलासा करावा, हीच पक्षाची भूमिका आणि मागणी असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
COMMENTS