मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उपरोधिक टीका केली आहे. महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू आणि ४५वी जागा बारामती असेल. ४८ पैकी ४५ बोलले हे बरं, नाहीतर ५० सांगायलाही कमी केलं नसतं. आता बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण? मोदी, शाह की देवेंद्र? जाहीर करा असं मलिक यांनी म्हटले आहे.
अमित शाह म्हणाले महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू आणि ४५वी जागा #बारामती असेल. ४८ पैकी ४५ बोलले हे बरं, नाहीतर ५० सांगायलाही कमी केलं नसतं. आता बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण? मोदी, शाह की देवेंद्र? जाहीर करा!
— Nawab Malik (@nawabmalikncp) February 9, 2019
दरम्यान अमित शाह आज लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर टीका केली आहे. देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी केली जात आहे. हे कसले गठबंधन ? हे तर सगळे राज्यातले नेते आहेत. जर महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली. अखिलेशला धुळयाला बोलावले तर कोणी ऐकायला जाणार आहे का? अशी टीकाही शाह यांनी केली आहे.
COMMENTS