राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य एन बी शेख यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य एन बी शेख यांचं निधन

लातूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रा. एन. बी. शेख यांचं काल निधन झालं आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दिर्घकालीन आजारानं त्यांचं निधन झालं असून औसाचे नगराध्यक्ष प्रा. अफसर शेख यांचे ते वडील होते. प्राचार्य एन बी शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अ.भा. अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष होते.  हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटीच्या आझाद महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी औसा येथे ग्रामीण भागातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. औसा ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणा काम केले आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक कामात त्यांची पुढाकार घेतला होता. शेख यांच्या निधनाने लातूर जिल्हा आणि औसा परिसरात शोककळा पसरली आहे.

COMMENTS