मुंबई – शरद पवारांच्या परवानगीने 2019 चा नव्हे तर 2024 चा तासगाव विधानसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. दिवंगत आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील हे 2024 मधील तासगावचे उमेदवार असतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काल सांगलीतील तासगाव येथे होती. यावेळी बोलत असतांना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच काल स्वर्गीय आर आर पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम काल पार पडला. यावेळी शरद पवार यांनीही अबांच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान यावेळी जयंत पाटील यांनी आज आबा असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या हृदयात हात घालून हवं ते काम करण्याची क्षमता आबांमध्ये होती असं म्हटलं आहे. तसेच 2019 च्या निवडणुका होतील. मला खात्री आहे की आमदार सुमनताईंच्या मागे आपली ताकद आणि पाठबळ उभा केली आहे आणि कराल. राष्ट्रवादीचा एकही उमेदवार मी 2019 ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अद्याप जाहीर केलेला नाही. मला मगापासून मोह होतोय, त्यामुळे मी शरद पवार साहेबांची परवानगी घेऊन मी हे जाहीर करतो की 2024 चा तासगावचा आमदार हा रोहित पाटील असेल. त्यांना तिकीट देण्याचा निर्णय आमचा पक्ष आज घेईल असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS