अजित पवारांना अर्थ तर ‘या’ नेत्याकडे गृहमंत्रीपदाचा पदभार !

अजित पवारांना अर्थ तर ‘या’ नेत्याकडे गृहमंत्रीपदाचा पदभार !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर 25 मंत्री कॅबिनेट आणि 10 नेते राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

कॅबीनेट मंत्री

अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड,राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनील केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख,दादा भुसे,जितेंद्र आव्हाड, संदीपान भुमरे, बाळाळाहेब पाटील,यशोमती ठाकूर, अनिल परब, उदय सामंत, के. सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख, आदित्य ठाकरे,

राज्यमंत्री

अब्दुल सत्तार,सतेज उर्फ बंटी पाटील,शंभूराज देसाई, बच्चू कडू, विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे,राजेंद्र पाटील

कोणाला कोणतं खातं?

दरम्या महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात अजित पवारांना अर्थमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर मंत्रिमंडळातील अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं गृहखातं अनिल देशमुख यांना देण्यात आलं आहे.
तर जयंत पाटील यांना जलसंपदा खातं, जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना अल्पसंख्याक आणि उत्पादनशुल्क अशी दोन महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं देण्यात आलं आहे.

COMMENTS