पुणे – पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून आगामी लोकसभेसाठी पुण्यातून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडणूक लढवेल अशी घोषणा अजित पवार यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान केली होती. परंतु लोकसभेच्या या जागेवर दावा सांगणारे अजित पवार आता याबाबत बॅक फुटवर गेले असल्याचं दिसून येत आहे. कारण आपल्याला तो विषय आणखी ताणायचा नाही. काँग्रेस , राष्ट्रवादीमध्ये कोणी लहान मोठा नाही. तेव्हा लोकसभेसाठी दोन्ही पक्षांत सन्मानपूर्वक जागावाटप होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पुण्याच्या जागेचा निर्णयही पक्षश्रेष्ठींवर सोडला आहे.
दरम्यान अशाप्रकारचा वाद उपयोगाचा नसल्याची जाणीव आता राष्ट्रवादीला झाली असल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आघाडीत बिघाड होऊन चालणार नाही. त्यामुळे आपल्याला तो विषय आणखी ताणायचा नाही. काँग्रेस , राष्ट्रवादीमध्ये कोणी लहान मोठा नाही. तेव्हा लोकसभेसाठी दोन्ही पक्षांत सन्मानपूर्वक जागावाटप होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकी अजित पवारांनी सावधानतेचा पवित्रा घेतला असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS