काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक !

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक !

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आज महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं आहे.  राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती, लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेची निवडणूक, सरकारविरोधात संयुक्त आंदोलन करण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याबाबतही प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत हजर राहणार आहेत. बैठकीत काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील सहभागी होणार आहेत. आगामनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असल्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS