पंकजा मुंडे माझ्या मित्राची कन्या, त्यामुळे बोलताना अडचण होते – अण्णा डांगे

पंकजा मुंडे माझ्या मित्राची कन्या, त्यामुळे बोलताना अडचण होते – अण्णा डांगे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी मंत्री अण्णा डांगे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. पंकजाताई मुंडे या माझ्या मित्राच्या कन्या आहेत. त्यांनी चोंडी प्रकल्पासाठी दोन कोटींचा निधी दिला खरा, पण तो निधी कुठे गेला हे कळलेच नाही, असे सांगत बोलावं तर अडचण, अशी आमची अवस्था झाली असल्याचं अण्णा डांगे यांनी म्हटलं आहे. चोंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान रोहित पवार यांच्या उपस्थितीत  कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आगामी निवडणुकीबाबत अण्णा डांगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.  आगामी निवडणुकीसाठी योजना आखा, चांगली योजना असेल तर मोठे यश निश्चित मिळते.

पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं गावाची नाडी ओळखनं गरजेचं आहे. जनतेशी सततचा संपर्क महत्वाचा आहे. गावागावात संघटनात्मक बांधणी होणे आवश्यक आहे. आगामी निवडणुका अटीतटीच्या होणार असल्याने सर्व ताकदीनिशी मैदानात उतरावे लागणार असल्याचा सल्ला यावेळी डांगे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

COMMENTS