विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा!

विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा!

मुंबई –  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सातारा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. परंतु यावेळी यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसल् या बैठकीस अनुपस्थितीत राहिले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. परंतु साताऱ्यातून विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसलेच पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या रुपाने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान मीसुद्धा बारामती मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी अर्ज केला नाही. मग याचा अर्थ असा लावायचा का, मी निवडणूक लढणार नाही. कामात व्यस्त असल्या कारणाने अर्ज भरायचा राहून गेला. त्यामुळे कोणताही तर्क वितर्क लावण्याचं काही कारण नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान आमदार इच्छुक आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS