नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी तेल्यामुळे राष्ट्रवादीसह तीन पार्टींचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाणार असल्याची माहिती आहे. सीपीआय, बसपा आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाणार आहे. या तिन्ही पक्षांची लोकसभेत खराब कामगिरी पहायला मिळाली आहे. या निवडणुकीत बसपाला 10, सीपीआयला 3 आणि राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत.. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. या तीनही पक्षांनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली आहे.
दरम्यान राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या निर्णयाची समीक्षा 5 ऐवजी प्रत्येक 10 वर्षांनी केल्यामुळे 2014 च्या निवडणुकीत खराब कामगिरीनंतरही या पक्षांना दिलासा मिळाला होता. निवडणूक चिन्ह अधिनियम 1968 नुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी किमान चार राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्याची गरज असते. याशिवाय त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार असणंही अनिवार्य आहे.परंतु या तीनही पक्षांची खराब कामगिरी सतत दहा वर्ष चालल्यामुळे त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS