राष्ट्रवादीच्या शिबिराकडे उदयनराजेंची पाठ, शिवेंद्रसिंहराजे यांची हजेरी

राष्ट्रवादीच्या शिबिराकडे उदयनराजेंची पाठ, शिवेंद्रसिंहराजे यांची हजेरी

सातारा – पक्षाला कधीच गिणतीत न धरणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाच्या चिंतन शिबिराकडे पाठ फिरवली आहे. तर त्यांचे चुलत बंधू आणि पक्षाचे सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चिंतन शिबिराच्या दुसर्‍या दिवशी चिंतन शिबिराला हजेरी लावली आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे ते सातारा या प्रवासात उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य केले होते. तेव्हा उदयनराजे आणि पवारांची आणि पक्षाशी जवळीक निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यामुळे उदयनराजे पक्षाच्या शिबिराला हजेरी लावतील अशी चर्चा होती. मात्र आतापर्यंत पक्षाच्या बैठका आणि शिबिराकडे पाठ फिरवणा-या उदयनराजे यांनी २०१९ च्या निवडणूक तयारीसाठी बोलवलेल्या शिबिराकडेही पाठ फिरवून आपल्याला पक्षाची गरज नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

COMMENTS