मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 77 उमेदवारांच्या या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह बड्या नेत्यांची नावे आहेत. रोहीत पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर परळीतून धनंजय मुंडे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, इस्लामपूरमधून जयंत पाटील या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान काँग्रेसनं उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असून पहिल्या यादीत 51 तर दुसय्रा यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे. दुसय्रा यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज, दोन विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या वाट्याला १३५ जागा येणार असून ऊर्वरित ३० पेक्षा जास्त उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
COMMENTS