पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत ठरलं, राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय !

पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत ठरलं, राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय !

मुंबई –   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे उपस्थित होते. या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पार्थला उमेदवारी द्यावी, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी दिला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात होते. परंतु काल झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पवार घराण्यातील शरद पवार, सुप्रिया सुळे आणि आता पार्थ पवार हे उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

 

COMMENTS