राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘यांना’ मिळणार संधी !

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘यांना’ मिळणार संधी !

मुंबई – राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. देशभरातून 58 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार असून महाराष्ट्रातील 6 जगांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. विविध पक्षातील हे सहाही खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी, काँग्रेसकडून रजनी पाटील, राजीव शुक्ला, शिवसेनेकडून अनिल देसाई, आणि भाजपकडून अजयकुमार संचेती यांचा कार्यकाळ संपत आला आहे. परंतु शिवसेनेनं अनिल देसाई यांची उमेदवारी कायम ठेवत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर राष्ट्रवादीनंही आपला उमेदवार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वंदना चव्हाण यांना राज्यसभेसाठी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

दरम्यान वंदना चव्हाण यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी एकच उमेदवार उभा करणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलं आहे. निवडणुकीची तारीख जवळ आल्यामुळे सर्वच पक्ष सध्या तयारीला लागले असल्याचं दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपला उमेदवार घोषित केला असला तरी इतर पक्षांच्या उमेदवारांची नावं सध्या गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS