पुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघातून अभिनेते अमोल कोल्हे यांचा विजय झाला आहे. कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. कोल्हे यांच्या या विजयामुळे याठिकाणी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
सुप्रिया सुळे, बारामती, विजयी
तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. सुप्रिया सुळले यांनी याठिकाणी युतीच्या कांचन कुल यांचा पराभव केला आहे. सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या किती मतांच्या फरकाने हरतील, हेच पाहायचं आहे, असं पाटील म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बारामतीची जागा जिंकण्याचा प्रबळ विश्वास व्यक्त केला होता. मात्र जवळपास लाखभर मतांची आघाडी घेत सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला आहे.
सुनील तटकरे, रायगड, विजयी
तर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या अनंत गिते यांचा पराभव केला आहे.गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना यांना 3 लाख 94 हजार 068 मतं मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते केवळ 2 हजार 110 मतांनी विजयी झाले होते. परंतु या निवडणुकीत मात्र तटकरे यांनी मोठ्या फरकाने याठिकाणी विजय मिळवला आहे.
संजय शिंदे, माढा लोकसभा, विजयी
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. याठिकाणी संजय शिंदे हे मोठ्या फरकारने आघाडीवर आहेत. याठिकाणी युतीच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव मानला जात आहे.
COMMENTS