विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून “यांना” उमेदवारी जाहीर !

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून “यांना” उमेदवारी जाहीर !

मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी पुढच्या महिन्यात मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक उमेदवार सहज निवडणू येणार आहे. त्यामुळे या उमेदवारीबाबत खूपच उत्सुकता होती. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पुन्हा विधान परिषदेत जाणार नाहीत. ते रायगडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांना उमेदावारी जाहीर केली आहे.

परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे  ते आमदार होते. मात्र यावेळी ही जागा काँग्रेसला घेऊन राष्ट्रवादीने उस्मानाबाद-बीड-लातूरची जागा लढवली होती. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. यावेळी मात्र त्यांची नाराजी दूर करुन त्यांना आमदारांमधून निवडणू द्यायच्या जागेसाठी विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

COMMENTS