नाशिक – एखाद्या विभागाने फाईल समोर आणली, तर त्यावर सही करताना मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करायला नको का, असा सवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या अटकेची फाईल ही मी मंत्री होण्याच्या अगोदरच तयार झाली होती, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना केला होता. त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं असून त्यावेळी मंत्री असताना भुजबळ यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाईलवर सही करताना मंत्री म्हणून आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करायला पाहिजे होता असं म्हटलं आहे.
दरम्यान भुजबळांच्या अगोदर युतीचं सरकार होतं. मग ही फाईल युतीच्याच कार्यकाळात तयार झाली का, असा सवाल भुजबळांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाला होता. ”युतीच्या काळात अशी कोणतीही फाईल तयार झालेली नाही. एखाद्या विभागाने फाईल तयार केलेली असेल तर कोणत्याही फाईलवर सही करताना भुजबळ यांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करुन सही करायला हवी होती, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS