मुंबई : पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते. पण, सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परिणामी संयम संपल्याने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते निकामी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
पवार म्हणाले, गेल्या 60 दिवसांपासून पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी भूमिका घेऊन आंदोलन केलं. कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी बसून आपलं म्हणणं मांडतात, संयम दाखवतात ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका घेणारे शेतकरी असताना केंद्राने सकारात्मक पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता. संयमाने आंदोलन सुरू असताना वेगळ्या मार्गाने म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. इतक्या दिवसानंतर संयमाने आंदोलन करणारे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्याकडे केंद्राने समंजसपणे पाहायला हवं होतं,
दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. यावर आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करत होते. मात्र, केंद्र सरकारने त्यांना गांभीर्याने न घेतल्याने आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यातही कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते त्यात अपयशी ठरल्याचेही पवार म्हणाले.
COMMENTS