मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाला अभूतपूर्व वळण लागलं असून आता शिवसेनेचा नाही तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ उभा करण्यास शिवसेना अपयशी ठरल्यामुळे आता राज्यपालांनी
राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा निर्णय सकारात्मक आला तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसह सरकार स्थापनेचा दावा करू शकते. परतु त्यासाठीही शिवसेनेचं साहाय्य लागणार आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी-काँग्रेसला पाठिंबा देणार का हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रिपदासाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि काँग्रेस-शिवसेना यांनी पाठिंबा दिला तर सत्तेत वाटाघाटी करताना दोन मुख्यमंत्री पदे असू शकतात. यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोघांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला नाही!महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या खेळात सोमवारचा दिवस अभूतपूर्व ठरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार असं वाटत असतानाच शिवसेना नेते राज्यपालांना भेटायला गेले. पण राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र आलंच नाही. राज्यपालांनी शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास नकार दिला. त्यानंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं आहे. सत्तास्थापनेची इच्छा आणि शक्यता असेल तर 24 तासात कळवण्याची मुदतही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS