भंडारा-गोंदियात पुन्हा मतदान घेण्याची राष्ट्रवादीची मागणी !

भंडारा-गोंदियात पुन्हा मतदान घेण्याची राष्ट्रवादीची मागणी !

भंडारा  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रांचा गोंधळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं आहे. त्यामुळे याठिकाणी मतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केली आहे. मतदान यंत्रात बिघाड झाल्याने भंडारा गोंदियामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत ३५ मतदान केंद्रावरचं मतदान रद्द करण्यात आलं असल्याची माहती आहे. सकाळपासून ६० ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी तंत्रज्ञांना बोलावून बिघाड दूर करण्यात आले आहेत.

दरम्यान मतदान यंत्राच्या गोंधळामुळे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही फेर मतदानाची मागणी केली असून भंडारा-गोंदियामध्ये २१०० पैकी साडेचारशे ईव्हीएम बंद पडल्याची माहिती मिळाली असून ही संख्या मोठी असल्यामुळे याठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मान्य करुन पुन्हा याठिकाणी मतदान घेणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS