विधानसभेचे कामकाज उद्यापासून,  उपमुख्यमंत्रीपदाऐवजी राष्ट्रवादी घेणार ‘हे’ पद ?

विधानसभेचे कामकाज उद्यापासून, उपमुख्यमंत्रीपदाऐवजी राष्ट्रवादी घेणार ‘हे’ पद ?

मुंबई – विधानसभेचे कामकाज उद्यापासून दोन दिवस चालणार असल्याची माहिती आहे. या कामकाजादरम्यान उद्या बहुमत चाचणी, परवा अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेता निवड केली जाणार आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हंगामी अध्यक्ष राहणार आहेत. उद्या सकाळी कामकाज सुरू झाल्यावर याबाबतची घोषणा होणार आहे. या घोषणेनंतर मंत्र्यांचा परिचय केला जाणार आहे.परवा विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक केली जाणार आहे. तर विधानसभा अध्यक्षाचीही घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड होणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे दिलं जाणार असल्याची माहिती असून उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीचा एकच उपमुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल. पण अजित पवार यांना हे पद द्यायचं की नाही यावरुन राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी हे पद थेट काँग्रेसलाच देऊन त्या बदल्यात विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS