…तेंव्हापासून लागलेली सवय 23 वर्षे झाली जात नाही – धनंजय मुंडे

…तेंव्हापासून लागलेली सवय 23 वर्षे झाली जात नाही – धनंजय मुंडे

पुणे – एका कार्यक्रमात भाषणादरम्यान भावनिक झालेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी धीर दिला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात हा प्रसंग घडलेला पहायला मिळाला. माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ हे धनंजय मुंडेसमोर पहिल्यांदाच भाषण करत होते. यामुळे भावनिक होऊन शेखर यांच्या तोंडातून शब्द न फुटता हुंदके आले. हे पाहुन व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडेंनी स्टेजवर जाऊन त्यांना धीर दिल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान माजी नगर सेवक शेखर ओव्हाळ यांचे भाषण ऐकून त्यांचे पाहिल्यांदाच भाषण होते यावर विश्वास बसणार नाही. त्यांचे भाषण ऐकून मला माझे सुरुवातीचे भाषण आठवले. 1995 ला मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून सत्कार झाला होता. तेव्हा, माझे पहिले भाषण झाले. दहा मित्रांनी दहा भाषणे लिहून दिली ते वाचले. परंतु, जेव्हा व्यापीठावर गेलो, हातात माईक आला, तेव्हा दहाच्या दहाही भाषणे विसरून गेलो होतो आणि मनाचे बोललो. केवळ आठ मिनिटे बोललो पण पोटात आणि मनातून आलेले बोललो होतो. त्यावेळपासून लागलेली सवय ती 23 वर्षे झाली जात नाही, असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

COMMENTS