अंजनडोहला आसरडोह उपकेंद्रातून विद्यूत पुरवठा जोडण्याची राष्ट्रवादीची मागणी !

अंजनडोहला आसरडोह उपकेंद्रातून विद्यूत पुरवठा जोडण्याची राष्ट्रवादीची मागणी !

बीड, धारुर – आपला देश शेतीप्रधान आहे. शेतकरी राजा आहे. हे म्हणायला व ऐकायला चांगले वाटते. पण शेतकऱ्यांची आवस्था नेहमी वाईटच आहे. शेती निसर्गावर अवलंबून,निसर्ग लहरी महंम्मद. कधी दुष्काळ तर कधी अतीवृष्टी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना आणखी एका मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ती समस्या म्हणजे विद्युत पुरवठा होय. मागे लाईट होती तर पाणी नाही, आता पाणी आहे तर लाईट नाही अशीच काहीशी अवस्था शेतकय्रांची झाली आहे.
ही व्यथा आहे धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकऱ्यांची. अंजनडोह येथील शेतकऱ्यांना सध्या धारूर विद्युत केंद्रातून वीज पुरवठा आहे. सदरील वीज इतर गावांना फिरुन २० कि.मी.अंतरावरून येत असल्याने पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. परिणामी विद्यूत पंप चालत नाहीत,अनेक वेळा पंप जळण्याचे प्रकार होतात. मग झाले उत्पन्न चार आणे आणि खर्च आठ आणे.

या त्रासाला कंटाळून अंजनडोह येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता.धारूर यांच्याकडे तक्रार केली. तसेच ०३ कि.मी. अंतरावर असलेल्या आसरडोह वीज उप केंद्रातून योग्य दाबाने वीज पुरवठा करावा. अशी मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. धारूरचे तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण अंबाजोगाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निवेदन देवून तात्काळ अंजनडोह येथील शेतकऱ्यांना आसरडोह वीज उपकेंद्रातून वीज पूरवठा करावा. अशी विनंती केली आहे.

याबाबत आमदादा प्रकाशदादा सोळंके यांनी सबंधित अधिकाऱ्यांना बोलून अंजनडोहच्या शेतकऱ्यांची समस्या सोडवावी.अशी विनंती प्रा. ईश्वर मुंडे यांनी प्रकाशदादा सोळंके यांना केली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता, अंबाजोगाई येथील उपकार्यकारी अभियंता ( कार्यालय ) थोरात यांच्याकडे राष्ट्रवादीचे धारूर तालुकाध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे यांच्या समवेत राष्ट्रवादी मिडीया सेल औरंगाबाद विभाग सरचिटणीस रविकीरण देशमुख,शेतकरी केशव डापकर, आबासाहेब सिरसर, संजय सिरसट यांनी निवेदन दिले आहे.

COMMENTS