बारामती – राष्ट्रवादीच्या कामगार नेत्याची हत्या !

बारामती – राष्ट्रवादीच्या कामगार नेत्याची हत्या !

मुंबई – बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार नेते दादा गणपत साळुंके यांची उजनी धरणाच्या पूलाखाली हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे.याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याता आला असून काल सायंकाळी ही घटना घडली आहे.

दरम्यानन या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.तसेच टेंभुर्णी पोलिसांना दादा साळुंके यांचा मृतदेह आढळला होता. त्याजवळ मोटारीच्या खूणा होत्या. त्यामुळे अन्यत्र मारुन मृतदेह येथे टाकला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मयताच्या अंगावरील कपड्यांवर बारामतीच्या सिक्वेरा टेलर्सचा उल्लेख होता. त्यावरून टेंभुर्णी पोलिसांनी बारामती, इंदापूर या भागात मयताचे फोटो सोशल मिडियावरून प्रसारीत करून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह दादा साळुंके यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान दादा यांनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नीला फोन करत काही लोक मला मारत असल्याचे सांगितले होते, संभाषण सुरु असतानाच फोन कट झाला. त्यानंतर तो स्विच ऑफ झाला होता. खरेदी-विक्रीच्या आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडला असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

साळुंके हे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे माजी अध्यक्ष होते. बारामती एमआयडीसीलगतच्या वंजारवाडी येथील ते रहिवाशी आहेत. त्यांच्या आईने वंजारवाडीच्या सरपंच-उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळली आहे. साळुंके यांचा एमआयडीसीत गौरव वॉटर सप्लायर्सचा व्यवसाय आहे.

COMMENTS