मुंबई – राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा आता विधानभवनार धडकणार आहे. विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला आझाद मैदानामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री शरद पवार, खा.प्रफ्फुलभाई पटेल, खा. माजीद मेमन, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ सभागृह नेते अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, मा.मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, विधानसभा गटनेते जयंतराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आ.विद्याताई चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आमदार किरण पावसकर हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान राज्यातील अनेक समस्यांबाबत हे आंदोलन करण्यात येणार आहे. वाढती महागाई, गृहनिर्माण धोरणातील त्रुटी, कामगार विरोधी धोरण, शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील रद्द केलेली पदे, नोटबंदी व GST मुळे अडचणीत आलेले लघू उद्योग, महिलांवरील वाढते अत्याचार, मुंबई विद्यापीठाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत या आंदोलनादरम्यान सरकारला जाब विचारण्यात येणार आहे.
COMMENTS