शेतक-याच्या चिमुरडीनं दिली सुप्रियाताईंना खास भेट, वडिलांसाठी ताईंकडे केली विनंती !

शेतक-याच्या चिमुरडीनं दिली सुप्रियाताईंना खास भेट, वडिलांसाठी ताईंकडे केली विनंती !

जळगाव – जळगावमधील रावेर यथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हल्लाबोल यात्रा पोहचली होती. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी निंबोरा गावातील देवानंद पाटील यांच्या केळीबागेला भेट दिली. त्यावेळी त्यांची चिमुरडी राजश्री हिने ताईंना केळीचा घड भेट म्हणून दिला. एवढच नाही तर तिने ताईंना आमच्या केळीला भाव मिळवून द्या म्हणजे माझ्या पप्पांची चिंता दूर होईल अशी विनंती केली. त्यावेळी सुप्रियाताईंनीही तिला केळीला भाव मिळवून देण्यासाठीच हा हल्लाबोल सुरु असल्याचं म्हटलं आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/965855326527422465

 

दरम्यान उत्तर महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरु आहे. जळगावमधील रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची सभा आज पार पडली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

COMMENTS