हल्लाबोल यात्रेचा समारोप ठराविक ठिकाणीच, धनंजय मुंडेंच्या इशा-यानंतर पोलिसांची माघार !

हल्लाबोल यात्रेचा समारोप ठराविक ठिकाणीच, धनंजय मुंडेंच्या इशा-यानंतर पोलिसांची माघार !

औरंगाबाद – राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा आज समारोप होणार आहे. या समारोपाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित सभेला पोलिस प्रशासनाने अखेर परवानगी दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री धनंजय मुंडेंच्या इशा-यानंतर पोलिसांनी या सभेला अकेर परवानगी दिली आहे. त्यामुळे आज विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील दिल्ली गेटसमोर ही सभा पार पडणार आहे.

दरम्यान शुक्रवारपर्यंत या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील दिल्ली गेटसमोर सुरु असलेले व्यासपीठ उभारणीचे कामही पोलिसांनी थांबवले होते. परंतु याबाबत माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी पोलिसांना जाब विचारला. आतापर्यंत याठिकाणी भाजपच्या अनेक सभा झाल्या मग मग आमच्याच सभेला परवानगी का नाही. या सभेसाठी विभागीय आयुक्त कार्यालायात घुसू का, सभा होऊ दिली नाही तर हजारो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर बसण्याचा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी नमती भूमिका घेत या सभेला परवानगी दिली आहे. आजच्या सभेचा मार्ग मोकळा झाला असून शरद पवार आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS