मुंबई – विदर्भात हल्लाबोल यात्रा काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता मराठवाड्यात हल्लाबोल यात्रा काढणार आहे. 16 जानेवारीपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. 31 जानेवारीला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर हे हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
विदर्भामध्ये नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने फसलेली कर्जमाफी, शेतीमालाला किफायतशीर भाव आणि कापसावरील बोंडअळी प्रकरण आणि यवतमाळ जिल्ह्यातील किटकनाशकामुळे शेतक-यांचे झाले मृत्यू याविरोधात हल्लाबोल यात्रा काढली होती. हिवाळी अधिवेशन ज्या दिवशी सुरू झाले त्या दिवशी नागपुरात त्याची सांगता झाली होती. त्यावेळी दोन्ही काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्र आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर ही यात्रा काढण्यात येणार आहे.
COMMENTS